Skip to content

शेततळे अस्तरीकरण

शेततळे कापड जोडणी सेवा

शेततळे अस्तरीकरण

शेततळे कापड (Pond Liner) जागेवर जोडणी करणे करीत आम्ही दिलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे, जमिनीचे नियोजन केलेनंतर आमचे प्रशिक्षित मनुष्यबळ हे आपल्या जागेवर येऊन प्रत्यक्ष अस्तरीकरण (Pond Lining) करून देतील, यांचेसाठी आम्ही शेततळे कापड जोडणीसाठी अत्याधुनिक Twinny T मशीनचा वापर करतो. या मध्ये दोन कापडांचे जोड हे चा मार्गदर्शक सूचनेनुसार करून दिले जातात.

आम्ही जाणतो आपल्या गरजा व त्यानुसार सर्वोत्कृष्ठ दर्जेदार शेततळे आपल्या जागेवर वेळेत बसवून देत त्या साठी आम्ही आमचे प्रतिनिधी प्रत्यक्ष्य जागेवर पाठवून तळ्याची मोजमाप घेऊन त्यानुसार शेततळ्याचे कापड बनवून पाठवतो या दरम्यान आमच्या प्रतिनिधी शेतकऱ्यास आवश्यक निर्देश व तांत्रिक माहिती देतात. शेततळ्याचे अस्तरीकरण साठी आम्ही आमचे खास प्रशिक्षित मनुष्यबळ प्रत्यक्ष आपल्या जागेवर पाठवतो.

जमीन तयार करणे

शेततळे तयार करणे

शेततळ्यासाठी जमीन तयार करताना दगडधोंडे, खडी इतर कुठलीही टोकदार वस्तू राहणार नाही यांची काळजी घेऊन मऊ माती वापरून जमीन तयार करावी. त्या नंतर पाणी मारून समपातळीत माती दाबून घ्यावी. तलावाचा माथ्यावर बांधामध्ये एक फूट अंतरावर चार खोदून घ्यावा.
आम्ही जाणतो आपल्या गरजा व त्यानुसार सर्वोत्कृष्ठ दर्जेदार शेततळे आपल्या जागेवर वेळेत बसवून देत त्या साठी आम्ही आमचे प्रतिनिधी प्रत्यक्ष्य जागेवर पाठवून तळ्याची मोजमाप घेऊन त्यानुसार शेततळ्याचे कापड बनवून पाठवतो या दरम्यान आमच्या प्रतिनिधी शेतकऱ्यास आवश्यक निर्देश व तांत्रिक माहिती देतात. शेततळ्याचे अस्तरीकरण साठी आम्ही आमचे खास प्रशिक्षित मनुष्यबळ प्रत्यक्ष आपल्या जागेवर पाठवतो.

कापड अंथरणे

मार्गदर्शक सूचनेनुसार जमीन तयार झाले नंतर लगेजच शेततळे कापड अंथरूण त्यांचे जोडणी करावी, हे करतांना कापडावर ठीकठिकाणी गरजेनुसार मातीचा गोण्या भरून ठेवाव्यात, जेणेकरून कापड हवेने उडून जाणार नाही, विपरीत वातावरणात अंथरणेची काम करू नये.

कापड जोडणे

तयार जमिनीवर कापड अंथरताना लगेजच दोन कापड एकमेकांना मशीन द्वारे जोडणी करत राहावे, असा पद्धतीने पूर्ण शेततळे अस्तरीकरण पूर्ण झाल्यावर लगेजच तलावात पाणी भरावी व नंतर लवकरात लवकर कापड बांधावरील चरामध्ये मातीने बुझवून घ्यावी.

शेततळ्यांची निगा

अस्तरीकरण पूर्ण झाल्यानंतर लवकरात लवकर पाणी पूर्ण क्षमतेने भरावेत. पाळीवप्राणी, वन्यजीव यांनी तलावाकडे जाऊ नये म्हणून तळ्याला कुंपण बसवून घ्यावें. शेततळ्याचा बांधाच्या बाहेरील उतारावर गावात लावणे किंवा दगड लावून घेणे आवश्यक आहे.
शेततळे अस्तरीकरण प्रक्रिया
Play Video

शेततळे विषयी माहिती साठी मला संपर्क करा

vishal-chavan-05

विशाल चव्हाण

प्रॉडक्ट हेड-जिऑमेम्ब्रेन